मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची पदे भाग ५

सत्कवींची पदे भाग ५

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


मार्कंडेय मुनि करी देवि, तव रहस्यतत्त्ववर्णन तें ।
प्राशन केलें भुक्तिद, मुक्तिद, सदमृत भरूति कर्ण नतें ॥१०॥
हे जननि महालक्ष्मी, स्तवन तव न ये, तथापि हें काही ।
केलें की रसनेंद्रिय-ह्रदयें करितात फार हेका हीं ॥११॥
या रामसुत मयूरा वर दे; परदेवते! करी मुक्त ।
प्रणत सकल तारावा होय महालक्ष्मि! हें तुला युक्त ॥१२॥

कोलासुर म्हणे, ‘जननिये । तुझें पाहिलें चरणद्वय ।
शिरीं हात ठेवी सदये । दीना रक्षी गे मजलागी, ॥४४॥
मारिला मायावी असुर । स्थला नांव ठेविलें कोलापुर ।
पूजा घेतसे निरंतर । भक्तजनांकडूनी ॥४५॥

जय देवी जय देवी, जय जय जगदंबे ।
मूळ स्फूर्ती जगत:स्थित्यंतारंभे ॥ध्रु.॥
करवीरपुरवासिनी पुरहररिपुजननी ।
मुरहरमानसरंजनि स्मरहरधरभगिनी ॥
नरकिन्नर सुर भूसुर नमिती त्वच्चरणीं ।
हरिहरवरपददायिनी करिवरमदगमनी ॥१॥

अगणितपारावारे निगमागमसारे ।
मृगलोचनि कल्हारे खगरथमनहारे ॥
नगरिपुसंकटद्वारे भृगुमुनिकौमारे ।
विगलितभवभयकारे सुगमे जनतारे ॥२॥

त्रिगुणातीते माते तापत्रयहतें ।
त्रिकांडवेदज्योते त्रिभुवनविख्याते ॥
त्रिदशेश्वरपदनमिते त्रिजगत्पतिकंते ।
त्रिदेहरहिते ख्याते त्रयमूर्तिस्मरिते ॥३॥

अघ-बग-हर-प्रिय-विनुते खगवरपदनमिते ।
लगबग नमना धावति सुर मधवासहिते ॥
झगमगती आभरणें मृगमदधृतितनुते ।
धगधग अकोंदयसम कांती त्वत्तनुते ॥४॥

तप्त हाटक जैसें विलसे सुरंग ।
तैसें जननी, तुझें अतिकोमल अंग ॥
तरती योगी होउनि पदपद्यीं भृंग ।
त्वद्‌बालक घे कुडची वीरा वोसंग ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP