मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची पदे भाग १

सत्कवींची पदे भाग १

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


ॐ नमो आद्यरूपे, देवी भगवती माते ॥
कालिका कामरूपें, शक्ती तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया, मूळपीठदेवते ।
झालिया भेटी तुझी, निवारिसी पापांतें ॥१॥

जय जय श्रीकुलदेवते, महालक्ष्मी ग माते ।
आरती घेउनिया ओवाळीन मी तूंतें ॥ध्रु.॥

अंबिका भद्रकाली, देवी आद्या कुमारी ।
मारिले चंड मुंड महिषासुर हे वैरी ॥
हर्षले देव द्विज, गाती जयजयकारीं ।
उजळुनी दीपमाळा ओवाळिती नरनारी ॥२॥

परिधान हेमवर्ण, कंठीं नवरत्नें हार ।
करतळें रातोत्पळें, अद्‌भुत जयजयकार ॥
अवतार कोलापुरीं, केला प्रताप थोर ।
मारिले दैत्य विकट, अघट कोल्हासुर ॥३॥

नासिकीं मुक्ताफळ, रत्नकुंडले श्रवणीं ।
घवघवीत नेपुरें हो, अंदु वाजती श्रवणीं ॥
मस्तकीं पुष्पहार दिसे, भासे वदनीं - ।
पौर्णिमा चंद्रबिंब, पृष्ठीवरी रूळे वेणी ॥४॥

नवकोटि कात्यायनी, चतु:षष्टी योगिनी ।
भूचरें जलचरें आई, तुजपासुनी ॥
ऐसी तूं महालक्ष्मी, जगत्राची जननी ।
नामया विष्णुदासा तुझें चिंतन ध्यानीं ॥

अमान-वनज-स्थान-सरसीकुलसंकुले ।
रमा कोल्हापुरक्षेत्रे वसतीति किमद्‌भुतम्‌ ॥

ध्याताऽध्यातांतशांतप्रियजनविभवायान्वहं या ह्रदन्त: ।
ख्याता ख्याताशाभ्युन्नतिवितरण शक्त्यालया या पयोब्धो: ॥
जाताऽजातादिदेवव्रजमनुजतते: श्रेयसे भूयसे सा ।
माता मातापसाराधितपदकमलाऽधोक्षजप्रेयसी स्यात्‌ ।

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP