मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २

श्रीमहालक्ष्मीसेवा भाग २

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


साधनचतुष्टय खुर चार । गाथे अर्थरुचिर ।
विणिला सत्संगें सुंदर । श्रद्धातूलीवर ॥१॥
अद्वयभक्ती हे कुसुमाली । अंबे, वर अंथरली ।
अद्‌भुत बोधउशी लघुतूली । विवेक - विरक्तें भरली ॥२॥
अनुभवदीप महा सोज्वळ । अभ्यास हें तैल ।
वाती अहं - ममता प्रकाशें । भासे जग गतमल ॥३॥
षडरिपु सुपारी फोडून । सत्त्वात्मक मन पान ।
अहंता जाळून लाविले । जगदंबें । वरि चूर्ण ॥४॥
शुद्धबुद्धी हे जायफळ । लवंग तूर्या विमल ।
सत्त्व हा खदिर अतिधवल । अर्क गुणाचा निवळ ॥५॥
अंबे । तांबुल हा घेणें । सर्वां आज्ञा देणें ।
श्रीरामचरणसह शयने । विनयी नारायण ॥६॥

नमश्वंडमुंडांतके सौख्यघटके ।
मदनसूदनमहाकंठपदके ॥ध्रु.॥
रक्तबिंबाधरे भक्तसुखसागरे ॥
रक्तभूग्रस्तसक्तांगहारे ॥
रक्तमालाधरे रक्तपटपरिकरे ।
रक्तबीजस्त्रिये धूततिलके ॥१॥

जय जय आदिमाया प्रणवरूपिणी ।
सर्वसाक्षी तूर्या जगव्यापिणी ॥ध्रु.॥
मूळब्रह्म अरूप शून्यवत्‌ भासे ।
ते तव उपाधीने आकार दिसे ॥
ऐशा चलनयोगें भूगोल ग्रासे ।
त्या योगें अद्वैत नाश होतसे ॥१॥

सत्यरूप तुझे सच्चिद्‌दायिनी ।
त्रिगुणीं मिळतां गुणमयस्वामिणी ॥
तीन देवां तुझ्यापासुनी उद्‌भव ।
ऐसी लीला दाविसी भक्तां स्वयमेव ॥२॥

भाळीं कुंकुम शोभे गंगेचा ओघ ।
कंठीं रत्नमाला, पुष्पांचा हार ॥
मस्तकिं वेणीं शोभे आकृति शेषाची ।
त्यांत सुवर्णजडित राखडि मोत्यांची ॥३॥
ऐसें ध्यान पाहुनि मन हें तटस्थ ।
होउनि अंतरीं वृत्ति आनंदभरित ॥
माधवेंद्रयती प्रेमाने डुल्लत ।
पाहुनि सद्‌गुरुनाथ वरदान देत ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP