मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४

श्रीमहालक्ष्मीसेवा भाग ४

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


सुधादृष्टि तव मिळवू कैशी? साधन मतिसी समजेना ।
विकलगात्र मी, चंचल मन हे कृपालाभ तव होईना ॥
 
पंचमहाभूतांची बनली माझी नश्वर ही काया ।
तीच साधने घेउन सजलो जगदंबे, तुज पूजाया ॥

श्रीलक्ष्मी जी त्रिभुवनजननी करवीरामधि वास करी ।
बघुनी, मध्यान्हीं भिक्षेस्तव रोज येत श्रीदत्तगुरू ॥
काशीविश्वेशासह सुरवर जिच्यासभोती बसतात ।
पद्यांबेचे दर्शन घेउनि भवाब्धिभीती दूर करू ॥
चक्रगदाधर गरुडारूढा दैत्यां जी बहु भयद दिसे ।
सद्‌भक्ताला कामधेनुरूप मूर्ति तिची नितमनीं धरू ॥
भक्तांसाठी भिन्नस्थलिं जी भिन्नस्वरूपा धरीतसे ।
आदिशक्तिला वंदुनि वदतो अनंत नित ‘श्रीदत्तगुरू’ ॥

नमितों योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत ।
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत ॥

जगीं जन्मुनी जगदंबेचे दास होउनी राहू ।
विश्वबांधवांसहित सर्वदा भक्तिसुधारस सेवू ॥

काव्यसेवका, जगदंबेचे असे तुला वरदान ।
‘ऐकूनि कविता जगद्‌रसिकता मुदें डोलविल मान ॥
प्रमाण मानिल, आणि आपुली स्वयें वाहते आण ।
अनुपम अभिनव तव कवनाला जनता देहल मान’ ॥

दिला मान, तो तिला वाहिला. मला कशाला भार? ।
पुरे माप पदरात घातले तोलुनि भारंभार! ॥१०॥

जगज्जननि, तव भक्तिसुधेची पावन भिक्षा घाल ।
दारिं पातला पहा तुझा हा भाग्यवंत कंगाल ॥५२॥
चाड मुक्तिचि नाहि जिवाला. मुक्तिचेहि ना कोड ।
जगन्माउली, दे अखंड तव भक्तिसुखाची जोड ॥५३॥

‘भ्रमें, भ्रमो भंगुर ते परते, होई तू मच्चित्त’ ।
माता आपण अशी प्रतिक्षण होती शिकवण देत ॥४९॥

पाठवि येथे ती आम्हांतें, मातेची नवलाई ।
चाकर आम्ही, दिधल्या कामीं न करु कधि कुचराई ॥१५९॥
मीतूपण अस्तवले, आले साधनेस पूर्णत्व ।
कणाकणांत कोंदले एकले एक नित्य सत्‌तत्त्व ॥१६०॥

जगन्माउली, आज्ञा होती ती पुनरपि उचलूच ।
भक्त होउनी त्वद‌यशोध्वजा जगीं उभारू उंच ॥१६२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP