सत्कवींची काव्ये भाग ४
देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.
जय देवी जय देवी जय श्रीजगदंबे ।
आरति ओवाळीतो आनंदकदंबे ॥ध्रु.॥
तुझें स्वरूप पाहतां मन माझें रमलें ।
मी-तूं-पण हें अवघें निरसुनिया गेलें ॥
जितुकें दिसे तितुकें त्वद्रूप झालें ।
तुझिया प्रसादें मम अज्ञान हरलें ॥१॥
देहाहंभाव माझा अवघा मावळला ।
तुझिया स्वरूपाचा अनुभवही कळला ॥
अद्वैत सौख्याचा वाटा मज मिळला ।
कामक्रोधाद्यरींचा नाशा पैं झाला ॥२॥
जिकडे पाहें तिकडे अंबा मज भासे ।
स्मरण करिती त्यांचें भवदु:ख नासे ॥
ज्ञानाचा तो ठसा ह्रदयीं प्रकाशे ।
हरि बहु प्रेमानंदें रंगुनि गेलासे ॥३॥
विडा घ्या हो अंबाबाई! जगज्जननी माझे आई ।
विनवितो दास प्रेमें, हस्त जोडुनी आई ॥
त्रिगुण पूगीफळ चूर्ण केलें निर्मळ ।
निर्गुण केशरानें रंगविलें सोज्वळ ॥१॥
प्रपंच पक्व पानें, हातीं घेऊनि विवेकानें ।
द्वैतभाव जाळुनिया वरी लाविला चुना ॥२॥
भावार्थ शुभ्र कात । प्रेम लवंग त्यांत ।
सुवासिक सर्व द्रव्यें मेळविलीं समस्त ॥३॥
जय जय कुलदेवते, आदिशक्ती मूळमाते ।
घेउनी विडा हातीं हरी तुज विनवीत ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2014
TOP