मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५

श्रीमहालक्ष्मीची पदे भाग ५

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


तस्मिन्‌ रत्नमयी मूर्ति: कमलाया: सुसंस्थिता ।
देवी कनकवर्णाभा भुजै: षोडशैर्युता ॥
महालक्ष्मी महामाया आदिशक्ति: परा स्वयम्‌ ।
भवविष्णुविरिंच्याद्यैरमरै: परिपूरिता ॥

पीठमध्ये जगन्माता भक्तानां वरदा स्थिता ।
तस्या वामे महादेवी रेणुका भक्तवत्सला ॥

जय अंबे कुलदेवी करविरपुरनिवासिनी
जय अंबे, कुलदेवी ।

जय अंबे, जय कृष्णामाते, पुण्यलोकसरिते ।
तुझ्या दर्शनें जीवन अमुचें अमृतमय होते ॥ध्रु.॥
हाटकेश्वरा वंदन करिती शिलाहार नृपती ।
त्यांनी स्थापिली उत्तरलक्ष्मी करहाटक प्रांतीं ॥
तुला पुजितां मंत्रघोष अन्‌ पुष्पें उधळीलीं ।
आई रेणुका दैत्यनिवारिणि वरदायिनि झाली ॥१॥

तुझ्या जीवनें पुष्पें फुलली, समृद्धी बहरली ।
प्रीतिसंगमीं विद्यानगरी खरीच अवतरली ॥
श्रीपादाची इच्छा इतुकी देवि प्रेमरूपा ।
भक्तांना तू घेइ स्वरूपीं, आई । कृष्णरूपा ॥

तुला अपीं कवनमाला । जरी नसे सुवास याला ।
परी तारी मज दीनाला । नमन भावें जगदंबे ॥६०॥
सीतारामात्मज हरिहर । जोडोनी भावें दोन्ही कर ।
विनवी तुज वारंवार । कृपा नित्य असावी ॥६१॥
माझी तूं कुलदेवता । तूं अससी जगन्माता ।
परी बालकाची चिंता । याहि असो द्यावीती ॥६२॥

अठराशे एकोणऐशीत । हेमलंबी संवत्सरात ।
अश्विन शुक्ल पक्षात । पंचमी तिथी होती ती ॥६९॥
या वेळीं ग्रंथ झाला । ईशेच्छेनेच केला ।
भक्त वाचोत याजला । नमन तुला जगदंबे ॥७॥
अकोला नगर विदर्भात । आहे, तेथेच रहात ।
पुण्यसमया नवरात्र । सेवा घेई जगदंबा ॥७१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP