मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
सत्कवींची काव्ये भाग ५

सत्कवींची काव्ये भाग ५

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


जय देवी जय देवी जय आदिशक्ती ।
आरति ओवाळूं तुज एकाग्रभक्तीं ॥ध्रु.॥
निर्गुण जें होतें तें सगुण त्वां केलें ।
चराचर हें अवघें तुजपासुनि झालें ॥
मायावेष्टित जन हें ऐसें त्वां केलें ।
त्रैलोक्यहि आपुल्या ऐसें त्वां केलें ॥१॥

ऐसीं सगुणे, तुजला लेणीं जडितांचीं ।
अनेक वस्त्रें शोभतिं कांचनवर्णाचीं ॥
बैसुनि सिंहासनीं, नृत्यें गणिकांची - ।
पाहसी तूं नयनीं जननी जनकाची ॥२॥
हरि-हर-ब्रह्मादिकही येती नवसांसी ।
जे जे वर मागति ते ते त्यांतें तूं देसी ॥

कृपाळू अंबे माते, पावसि भक्तांसी ।
परशुरामा दीना करुणाकर होसी ॥३॥

करवीरालयवासिनी, मंगलगुणशाले ।
कोल्हासुरपरिमर्दिनि, सुपयोनिधिबाले ॥
कटितटचुंबितजांबूनदचारुदुकूले ।
मुकुटोत्कटकरनीलांकृत निजभाले ॥१॥
जय देवी, जय देवी जय सुंदरि कमले ।
कमलासनकमलाधवपूजितपदकमलले ॥ध्रु.॥

चामीकरकृतकंकणमंडितकरजाले ।
कांचनमयमणिकांचीकिंकिणिरवहेले ॥
ह्रदयस्थलपरिरंजितमुक्ताफलमाले ।
राकाहिमकरवदनस्मितचारुकपोले ॥
इंदीवरदलनयने नंदितशुभशीले ।

बिंबाधर रुचिराजितरदनावलिलीले ॥
पार्श्वद्वयधृतवाणीकालीप्सित मौले ।
वरदे. शिवयतिसुखदे, फलदे. हरिमहिले ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP