सत्कवींची काव्ये भाग ७
देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.
धन्य धन्य करवीर नगरी । भगवा झेंडा, फेटा भरजरी ॥ध्रु.॥
त्रैलोकीं नाव ते ज्याचे ।
निशिदिनीं गाजते साचे ।
त्या शिवछत्रपतींचे ।
वंशज आहेत इथे या करवीर नगरीं ॥१॥
शिवबाच्या स्नुषा म्हणुनी ।
गाजते नाम त्रिभुवनीं ।
रणरागिणि ताराराणी ।
यांनीच स्थापिले राज्य या करवीर नगरीं ॥२॥
महालक्ष्मी अंबाबाई ।
देवालय मध्य या ठाईं ।
कल्पनाच चालत नाही ।
नरसोबाची वाडी विख्यात ।
विशाळी व प्रयाग प्रख्यात
तीर्थस्थाने ही करवीरात ।
ज्योतिर्लिंग दख्खनचा राजा या करवीर नगरीं ॥४॥
पन्हाळा व पावनगड ।
विशाळगड व भुदरगड ।
गगनगड व सामानगड ।
दिपविती नयन हे किल्ले करवीर नगरीं ॥५॥
पंचगंगा नदीचे पाणी ।
कळंबा तलाव आणी ।
विहिरी तळीं ठिकठिकाणीं ।
पिकांत पीक उसाचे या करवीर नगरीं ॥६॥
सणांत सण तो दसरा ।
त्यांत आणि त्र्यंबुलीयात्रा ।
लवाजमा खडा तो सारा ।
प्रभु राजाराम छत्रपती या करवीर नगरीं ॥७॥
राजर्षि शाहु करवीर ।
यांचे शीघ्रकवी जे थोर ।
ते गुरु लहरी हैदर ।
शाहीर पिराजी गातो या करवीर नगरीं ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2014
TOP