सत्कवींची पदे भाग ३
देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.
उन्नत कुचतटें परमामृतें भरलीं ।
तेणें जीवरत्नें वाढविलीं चहु भूतग्रामींचीं ॥१५॥
दोन्ही पक्ष ऐक्य करुनी अंबा ल्यायिली कांचोळी ।
उदररेखा तळीं त्रिवेणी जैसी ॥१६॥
अनंत ब्रह्मांडें तुझे उदरीं होतीं जातीं ।
तें उदर अल्पमती मी वर्णूं कैसें? ॥१७॥
दक्षिणावर्त नाभी, कटीं कटिसूत्रांची प्रभा ।
कासे पीतांबराची शोभा सुरंग शोभे ॥१८॥
कोमल जानु जघन आणि चरणीं वाकी अंदु ।
मधुर मंजुळ शब्दु तेथ उमटताती ॥१९॥
इंद्र्नील कोमल जेवी निघाले अंकुर ।
तेवीं गुल्फद्वय सुंदर दिसे जननियेचे ॥२०॥
पाऊलें पुनिवंत, तुझी पाऊलें पुनिवंत ।
भक्तचकोर चिंतीत तन्मय जाहाले ॥२१॥
शोधिल्या दीपकळिका तेवीं सुलक्षण अंगोळिका ।
नखमंडळीं मयंका तेथे उपमा सानी ॥२२॥
ध्वजवज्रांकिंत आणि पूर्व ऊर्ध्वरेखा ।
सनकादिकां सुखा तेथे पवाडु कैचा ॥२३॥
त्या चरणांचें अधिष्ठान मागे नागेशाचें अज्ञान ।
तें देणें वरदान महालक्षुमिये ॥२४॥
तेव्हां अंबा पुढारली, तिनें भवभ्रांति निरसिली ।
सिद्ध नागेशीं मिनली चैतन्यकळा ॥२५॥
लक्ष्मी जगदंबा जगदंबा । मम कुलदैवत अंबा ॥ध्रु.॥
श्याम चतुर्भुज मूर्ती । दोहीं डोळां भरली पुरती ॥१॥
सच्चित्सुख मुळ मंत्री । व्यापक बिंदू सोहंसूत्री ॥२॥
सबाह्य अंतर साची । मूर्ती ओतिलि ब्रह्मरसाची ॥३॥
शिवदीन बालक पाळी । केशरि मळवट भव्यकपाळीं ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2014
TOP