मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५

स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ५

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


शुक्ल अश्विन अष्टमिरात्रीं । धाडिते मना करवीरीं ॥
त्यासंगें सिंधुकुमारी । मम सदना ये लौकरी ॥
तव उत्सव करिन मी भारी । नवविधाभक्ति-उपचारीं ।

तू होसी प्रथम कुमारी । युवती ही दुसर्‍या प्रहरीं ।
तिसर्‍यात वृद्ध हो नारी । चवथ्यात करविरीं जावी ॥

तू पतितपावनी माते । किति वर्णू तव ध्यानातें ॥
परि अपुल्या उद्धारातें । तव गुणानुवाद मि गाते ॥
मज तारि तारि दीनातें । धरि कवटाळुनि बाळातें ॥

चला सख्यांनो. करविर क्षेत्रीं जगदंबा पाहू ।
हळदी-कुंकू ताटिं भरोनी आनंदें वाहू ॥

सागरतनया श्रीविष्णूचे त्यागुनि अर्धांगा ।
दीन-अनाथ-उद्धारास्तव आलि असे वेगा ॥

एकविसावी केली, करवीर क्षेत्रीं ।
पाहिली म्यां नेत्रीं अंबाबाई ॥
बाविसावी केली, करवीरवासिनी ।
नमिते विष्णुपत्नी वारंवार ॥
तेविसावी केली तुज आदिमाये ।
दावीं मज पाय आधी तुझे ॥

चला जाऊ ग पाहू, जाऊ ग पाहू ।
पाहू या कोल्हापूर । तेथे राणी ग मनोहर ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP