मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४

मुक्तेश्वरांच्या वाङ्मयातील श्रीमहालक्ष्मी भाग ४

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


महालक्ष्मी कुलस्वामिनी । भैरवदेव दंडपाणी ।
त्यांचे चरण चिंतितां मनीं । सिद्धी होती वोळगण्या ॥

यं शैवा: समुपासते शिव इति, ब्रह्मेति वेदान्तिनो ।
बौद्धा बुद्ध इति, प्रमाणपटव: कतेंति नैयायिका: ॥
अर्हन्नित्यथ जैनशासनरता:, कमेंति मीमांसका: ॥
सोऽयं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि: ॥

यं शैवास्समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदांतिनो ।
बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कतेंति नैयायिका: ॥
अर्हश्वेति ह जैनशासनमति: कमेंति मीमांसका: ।
सोऽयं वो विदधातु वांछितफलं श्रीकेशवेशस्सदा ॥

एष ब्रह्मा च विष्णुश्च शिव: स्कन्द: प्रजापति: ।
महेन्द्रो धनद: कालो यम: सोमो ह्मपांपति: ॥
पितरो वसव: साध्या ह्यश्विनो मरुतो मनु: ।
वायुर्वहनि: प्रजा: प्राण ऋतुकर्ता प्रभाकर: ॥

ॐ नमो लीलाविश्वंभरा स्वामी । तुझिये स्वरूपपरब्रह्यीं ।
पंचायतन पंचनामीं । कल्पिजेती अवयव ॥
तेथे शिव तो निजमस्तक । विष्णु सूर्य द्वयहस्तक ।
सव्य चरण विनायक । वाम तो शक्ती साजिरा ॥
याचा हाचि अभिप्रावो । जे वस्तुवेगळें दुसरें वावो ।
तेथें आननमनें येकात्मभावो । जाणिजे तें निजनमन ॥

जयातें बोलती परमात्मा । विष्णु शंकर अथवा ब्रह्मा ।
जो असेल. तयाची प्रतिमा । व्यक्ताव्यक्त नमियेली ॥

ॐ नमो विश्वंभरा देवा, । अभेदभावें तुझी सेवा ॥
तूंचि विश्वाससी जीवा । प्रतीति बाणे निधरिं ॥
हरि हर सूर्य गणेश शक्ती । तूंचि एक बहुधा व्यक्ती ।
जेथें धावे मनोवृत्ती । तेथें तूं येकु ॥

कैवल्यकनकसभापति । तांडवशंकर उदारकीर्ति ।
चिदंबरेश्वर चिन्मूर्ति । कामाटवीदाहक ॥
जो दशभुजपंचानन । व्याघ्रचर्मांबर परिधान ।
कर्पूरगौर गजाजिन । शोभला घन चांदिणें ॥

मुक्तेश्वरांचे सरस्वतीस्तोत्र
आतां सारस्वतफळसभारीं । कल्पलतिका अतिसाजिरी ।
ज्ञानगंगेचा ब्रह्मगिरी । वेष ब्रह्मकुमरीचा ॥
लोकलावण्यनागरी । शृंगारश्रीपर्वतभ्रामरी ।
साहित्यबाणलिंगाची खरी । विशाल नदी नर्मदा ॥
प्रमेयपोतासाची रंभा । विद्यामूळपीठ जगदंबा ।
चातुर्यसौभाग्याची शोभा । कुलस्वामिणी कवींची ॥
नवरसांची मंदाकिनी । महिमेनें वाहे त्रिभुवनीं ।
तिहीं लोकां वरदायिनी । देवत्रया पढयंती ॥
निगमकामधेनूच्या उदरीं । सारनवनीत दुरीच्या दुरी ।
दोहनमंथनावांचूनि करीं । दे अज्ञान बालकां ॥
ते सुवाणी शुभकल्याणी । अर्थखाणी सकळा जाणी ।
जीसि निर्वाणीं गिर्वाणी । चतुर सुवाणी याचिये ॥
वीणापुस्तकशुकधारिणी । मौर्ख्यदारिद्रपरिहारिणी ॥
पांडित्यदानें सुखकारिणी । ते वंदिली शारदा ॥
तिनें अनुग्रहाचा हात । शिरीं ठेविला वरदवंत ।
म्हणे तुझा मनोरथ । सर्वदा सुफळ माझेनी ॥

‘तुं काई जगन्माउली ?’ राम बोले ।
वरा बोलतां ये जगीं नाम झालें ॥
भवानी मुखें रामचरित्र वानी ।
म्हणे, ‘ब्रह्म तूं, सत्य साचार वाणीं ॥

येका जनार्दना शरण । उत्तरकांड रामायण ।
संतकृपेनें जालें पूर्ण । सकल लोकां तारक ॥
पवित्र सरिता कृष्णवेणी । पंचगंगा संगमस्थानीं ।
नृसिंह सरस्वतींच्या चरणीं । ग्रंथ प्रकट लाधला ॥
तेथें जाली देववाणी । ग्रंथ पाववा प्रतिष्ठानीं ।
येकनाथायिचे सदनीं । विस्तारेल जनमुखें ॥

भुजंगपंत (अत्रिगोत्री) - चिंतोपंत (विश्वंभर) -
मुक्तेश्वर (कवी) - निरंजन - आकाण्णा गोसावी -
मुक्तेश्वर (तेरवाडच्या इनामाचे संपादक, इ. स. १७२७)- निरंजन.


N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP