मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६

स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ६

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


षोडशोपचारीं करू पूजना । तुजसहित पुजू व्यंकटरमणा ।
देई दर्शना हे हरिरमणी । प्रसन्न व्हावे माय भवानी ॥

आदिमाया, आद्यशक्ती तू महेश्वरी ।
कोल्हासुर मर्दुनी तू वससि करविरीं ।
महिमा बहु थोर तुझा वेद वर्णिती ॥१॥

आमुचे घरचे कुलदैवत । करवीरामाजीं वसत ।
आणुनी मानसमंदिरात । श्रीकृष्णसेविका पूजिते ॥

चला जाऊ कोल्हापुरीं अंबादर्शनाला ।
हळदीकुंकू भरुनी तबकीं करू पूजनाला ॥
नऊ दिवस नवरात्र मातेचा सोहळा ।
गळां शोभते मातेच्या मौक्तिकांच्या माळा ॥
द्वितीयेची चंद्रकोर, भाळावरी तेज फार ।
तृतीयेला पांघरला भरजरी शेला ॥
चतुर्थीची चंद्रकळा, पंचमीचा रंग न्यारा ।
दैत्य संहारुनी अंबा बसली सिंहासनीं ॥
षष्ठीदिवशीं हिरे झोक, अंबा ल्याली अलंकार ।
सप्तमीला सप्त ऋषी येती दर्शनाला ॥
अष्टमीला धरुनी फेर, खेळे अष्टभुजा ।
जोडुनिया दोन्ही कर, नमस्कार माझा ॥
नवमीला गोंधळ घालू, मागू जोगव्याला ।
दसर्‍याला अंबाबाईचा उदो उदो बोला ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP