मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीमहालक्ष्मीची पदे|
स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४

स्त्रीगीतांतील श्रीमहालक्ष्मी भाग ४

देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.


पंढरपुरवासिनि अंबे, येई माझ्या ध्यानीं ।
आदिनारायणि, भक्ताभिमानी, जिवलगे ॥
कृष्णाबाई, योगेश्वरि, अंबा भासे चराचरीं ।
येई गे अंतरीं वाट वाहे मी तुझी ॥

श्याम सुनीळ रूप मनोहर चंद्र सूर्यापरी हो ।
विश्वंभरित रूप. अकाळांसही तुझी दीप्ति हो ॥

वंदन हे अंबे मूकांबे । सुंदर मोहिनि विश्वकदंबे ॥ध्रु.॥
श्रीमन्महाकालि महेश्वरी । तामस महिषासुर विदारी ॥
चामुंडादिक दैत्यसंहारी । कामुक दुर्जन दुष्ट निवारी ॥
हेमांबरभूषे जगदंबे ॥१॥
मूलाधारि हे प्रणवरूपिणि । चाळकि विश्वा कार्याकारिणि ।
काळि सर्वालंकारभूषिणि । आलय विश्वाधारि सगामिनि (?) ।
शूल-त्रिशूलधारि दुर्गांबे ॥२॥

कोमल तनुराजित महादेवि । सोमसूर्यादिकां प्रभे लपवी ।
नाम स्मरे त्यां तूर्या प्रभावि । धाम निजपद स्वरूप दावी ।

व्योमचिदानंदे स्वयंभे ॥३॥
नारद तुंबर वेद हे गाती । परावाणि परात्पर ज्योति ।
दूर करी भव, देउनि स्फूर्ती । तारक गुरुपद दे निजशांती ।
पूर्णप्रकाशप्रभे चिदांबे ॥
वंदन हे अंबे मूकांबे ॥४॥

इंदिरादेवी माधवरमणी दावी पदा ॥ध्रु.॥
भजत बा मना केशवललना, करवीरवासी ही मनमोहना ।
तिज नर जपतां दावी पदा ॥१॥
चतुर्भुजा ही घेइ निजकरीं ।
भक्तास्तव आयुधें बहुत परी ।
संकट वारी, दावी पदा ॥२॥
भवसिंधुतुनी काढि पद्मिनी ।
रत्नाकरतनया जगजननी ।
मागे ही उमा, दावी पदा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP