सत्कवींची काव्ये भाग २
देवीभागवत महापुराणात करवीर निवासिनी महालक्ष्मीला प्रथम स्थान दिले आहे, तिरूपति बालाजीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन भक्त घेतातच.
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी करवीरीं तूं विश्वाच्या पक्ष्मीं ॥ध्रु.॥
श्रीपति तुझिया योगें श्रीहरिला नाम ।
ब्रह्मादिकही ध्याती, पुरविसि तत्काम ॥
निष्कामें जे भजती पावति निजधाम ।
योगी ध्यानें पावति पद आत्माराम ॥१॥
जप तप सिद्धी तुजविण कांहीं साधेना ।
प्रसन्न होता भक्तां भवमय बाधेना ।
तुजवाचुनिया अंबे, शांती लाधेना ।
वेदान्तींचें सारहि शिष्यां बोधेना ॥२॥
गर्जति निगमागम परि वाणीला गौप्य ।
जें जें वर्णिति तें तें माये, तव रूप ॥
कोण करी मग तूझ्या सगुणत्वा माप ।
स्तवितां सहस्त्रवदनीं श्रमला कीं साप ॥३॥
दंभें, दर्पें, मानें, क्रोधें जे रहित ।
भजती तव चरणां त्यां साधे आत्महित ॥
उद्धरती ते प्राणी परिवारांसहित ।
देवी त्यांला करिसी श्रीपतिसन्निहित ॥४॥
बाधा भवभीतीची तव दासां नाही ।
माये, न करिसि मोहा चंचल तें काही ॥
ह्रदयीं अखंड माझ्या तूं सदये, राही ।
गोविंदात्मज विप्रा स्वकदासीं पाही ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : March 15, 2014
TOP