संगीत रामराज्यवियोग
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(२०-१२-१८८४). संगीत : खुद्द नाटककार
१ (चाल : झाली अहो राजेंद्रा हरिश्चंद्रा)
मन माझे भडकुनि गेले आली भ्रांति चित्तासी
म्हणोनिया दैवा झालें ऐसी कारागृहवासी
रामाच्या अभिषेकाने होइल भरत उदासी ॥
मग कौसल्येची सत्ता न पुसे कोणी कैकयिसी ।
गणती मग माझी कोठे आश्रयहीन ही दासी ॥
जरि सुटले आजचि येथुनि साधिन कार्यासि ॥१॥
२ (चाल : अभिमन्यू मधुलोलुप)
कवणे तुज गांजियले सांग सुंदरी ॥
त्यजुनि शेज लोळसि कां ऐसि भूवरि ॥ कवणें० ॥
प्रिय नाही तुजविण मज अन्य कामिनी ॥
इच्छिशि तरी दास्य करिल इंदूकामिनी
(चाल) रंकाते राव करिन । रावाते करीन दान
वध्याते प्राणदान । निर्वघ्या खचित वधिन ।
(चाल) रामाची शपथ सर्व सत्य मी करी ॥ कवणे ० ॥
३ (चाल : काय सान मानसा)
शांत दांत कालिका ही
चारुगात्री देवता ही ॥धृ०॥
त्रस्त जगा शांत करी बधोनि रिपुमत्ता ही सदाही ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP