संगीत पंडितराज जगन्नाथ
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(९-१०-१९६०). संगीत : वसंत देसाई
१
सावन-घन गरजे; बजायें
मधुर मधुर ‘मल्हार’ ! ॥धृ०॥
चमचम नाचे उसकी सजनी, छेल छबेली नर.!
इंद्रधनुषका मोरमुकुट सिर, सावनघन घनशाम चढायें !
गोरी गोरी बिजली गोपी, अपना सुंदर रूप दिखायें !
शहनाई बनपवन बजायें !
करे मयूर पुकार !.
हरियाला सावन मनभावन
बरसे अमृतधार !.
२
मदनाची मंजिरी ॥धृ०॥
साजिरी । उषाच हंसरी ॥
चंद्रिकाच कोंवळी । काय ही नाजुक चांफेकळी ? ॥
गुलाब या गालीं, केतकी कांतिमान भालीं ।
रुप-यौवनानें बहरली बाग वसंतातली ! ॥
रसिक मनोहारिणी घटीं या रसिकचित्त भरुनी-
कुरंग-नयना कुठें आजला गज-गमना चालली ? ॥
उरोज कुंभापरी रम्य हा कुंभ शोभतो शिरीं ।
सुधा-कुंभ घेउनी येई का रंभा वसुधातलीं ? ॥
३
नयन तुझे जादुगार ॥धृ०॥
हरिणीची हरिती नूर ।
त्यांत सुंदरी कशास
काजळ हे घातलेस ? ॥
साधाही नयन-बाण
विंधितसे काळजास ।
मग त्याला कां उगाच
काळकूट माखतेस ? ॥
४
जय गंगे भागीरथी । हर गंगे भागीरथी ॥धृ०॥
जयजयकारें तुझ्या मंगले !
दुमदुमले अंबर-धरती !.
उदक नव्हे, तव उदारताची
अखंड वाहे या जगतीं !.
परम दयाळे ! महन्मंगले !
देई भक्ताला मुक्ती !.
जय गंगे भागीरथी । जय गंगे भागीरथी ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP