संगीत कटयार काळजात घुसली
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१-१०-१९६७). संगीत : जितेंद्र अभिषेकी
१
तेजिनिधि लोहगोल भास्कर हे गगनराज
दिव्य तुझ्या तेजाने जगमगले भुवन आज
हे दिनमणि व्योमराज भास्कर हे गगनराज ॥धृ०॥
कोटि कोटि किरण तुजे अनलशरां उधळीती
अमृतकण परि होउन अणुरेणू उजळीती
तेजातच जनन मरण तेजातच नविन साज
हे दिनमणि व्योमराज ॥
ज्योतिर्मय मूर्ति तुझी ग्रहमंडळ दिव्य सभा
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा
देइ प्रभो नवप्रकाश होवो जीवनविकास
वसुधेयी राख लाज हे दिनमणि व्योमराज ॥
२
या भवनातिल गीत पुराणे, या भवनातिल
मवाळ, हळवे सूर, जाऊ द्या आज येथुनी दूर ॥धृ०॥
भावभक्तिची भावुक गाधा, पराभूत हो नमविल माथा
नवे गीत अन् नवे तराणे, हवा नवा तो नूर ॥
३
घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद ॥धृ०॥
मिटतां कमलदल होई बंदी भृंग
तरि सोडिना घ्यास, गुंजनांत दंग ॥
बिसतंतु मृदु होति जणुं वज्रबंध
स्वरब्रह्म आनंद । स्वर हो सुगंध ॥
घेई छंद मकरंद-प्रिय हा मिलिंद
मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद॥
४
(राग : मिश्र बिलावल, धुमाळी)
दिन गेले भजनाविण सारे ॥धृ०॥
बालपण रमण्यात गमविला
यौवनात धन लौकिक प्यारे ॥
मोहापायी मूल हरपले अजुनी शमेना तृष्णा कां रे ॥
म्हणे कबीर, साधुजन ऐका भक्त प्रभूचे तरले सारे ॥
५
हे नंदलाल
मुरलीधर श्याम ॥धृ०॥
तूच गुरू, तू एकच माता
संगीताचा तूं उद्गाता ॥
तारक तव शुभनाम
तूच स्वरेश्वर
तू लयभास्कर
कलासाधका तूच विधाता
प्रतिभेचे सुखधाम ॥
६
सुरत पियाकी छिन विसराये ।
हर हरदम उनकी याद आये ॥धृ०॥
नैनन और न कोड समाये
तरपत हूं बिलखत रेन निभाये
आँखियाँ नीर असुबन झर लाये ॥
साजन बिन मोहे कछुना सुहाये
इस बिगरो को कौन बनाये
हसनरंग असु जी बहलाये ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP