संगीत अशी बायको हवी !
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
१
मीही सुंदर तुही सुंदर आज भासते सारे सुंदर
जग हे सुंदर नभ हे सुंदर जे जे दिसते ते ते सुंदर
निळे भोर हे आभाळ मोकळे रविकिरणांचे मळे उमलले
स्वर्गाचे बघ दार उघडले अमृत रसाचे सांडती पाझर
धाव राधिके धाव लौकरी अनंतामध्ये मारू भरारी
आनंदाचे तुफान उठले सर्वांगाला पंख उगवले
सौंदर्याचा पहा उसळला जिकडे तिकडे अथांग सागर
२
नगरि ही सौंदर्याची खाण कुणी पद्मिनी, कुणी चित्रिणी
मीनाक्षी कुणी हरिणाक्षी कुणि
त्यातिल दो नयनांचे मजवरि झाले शरसंधान
सुंदरतेच्या कथाहि सुंदर सुंदरतेतील व्यथाहि सुंदर
सुंदर या ह्रदयी रुतलेला सुंदर तोही बाण
जिकडे तिकडे सुंदर सुंदर त्यातच मीही झालो सुंदर
खरोखरी परमेश्वर सुंदर त्याचे हे वरदान
३
अशी ऽ अशी बायको हवी मला हो, अशी बायको हवी
पोर असावी अल्लड भोळी भाव निरागस लाजरी कळी
रुसवा फुगवा तिचा असावा लाडिक अन् लाघवी, मला हो
अशी बायको हवी,
नार असावी नेक पतिव्रता तिज लाजाव्या द्रौपदी सीता
पतिपरायण सती असावी नेत्र न जी चाळवी, मळा हो
४
नाजुक ऐशा या जखमेला दवा नको पण दुवा हवा
निर्लेप अशा ह्रदयावरती मृदुल करांचा लेप हवा
नको कुणी वेदता विशारद नको कुणी तांत्रिक नवा
नकोच धन्वंतरी कुणी परि प्रणयाचा मांत्रिक हवा !
या जखमेला तुझ्या प्रीतिचा खास मुलायम मलम हवा !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP