संगीत सौभाग्यलक्ष्मी
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१९२५). संगीत : शंकरराव सरनाईक
१
(राग : पिलु मिश्र, ताल : केरवा)
गोजिर्या कळ्या-फुलानो ।
सृष्टीमाय-सोनुल्यांनों । ही कां मौनता ?
का असा उगाच रुसवा अबोला वृथा ?
कां स्पर्श पापि विधवेचा ?
भाव अमंगळ खुल्या दिलाचा ?
ओसरला का तेजोगंगा ?
भ्रष्ट काय झाला ? सांगा नको मौनता !
२
बोल हांसरे । बोल प्यारे
बुलबुला । हा विषाद का रे ?
भावना भंगून जाता
जीव मेला ह्या जगाला
मोह-माय-पाश आतां
तोडिले भवबंध सारे
दैव दुष्ट सदैव छळतां
आज होत अखरे ही ।
चालले टाकून तुजला
राजसा, निरोप दे रे ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP