मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा

संगीत राक्षसी महत्त्वाकांक्षा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२०-९-१९१३). संगीत : वझेबुवा


मी नवबाला जोगिण बनले । जोगिण बनलें ॥
जगा विसरलें । जगा विसरलें । सुखा विसरलें ॥ मी नव० ॥
यौवनही नच गणिले हाय ॥धृ०॥
परमात्मा वल्लभ शोधाचे । पिसेंच भरलें ॥ जगा० ॥१॥
सांडुनि अवघे मार्ग सुलभ या । प्रेमाच्या वाटे अनुसरले
थोर प्रीतिबल योग मांडिला । प्रेमे हे आदरले ॥२॥


लावि चटका गुणगाना ॥ यशपाना ॥धृ०॥
रसविभवा । अनुदिनिं दावी ॥
करि ही लोलुप रसना ॥१॥ यशपाना० ॥
दिव्य गुणामृत । सेवुनि प्रीति ।
होई यौवन लीना ॥२॥ राग पाना० ॥


(राग : मांड, दादरा, चाल : छा गयो तेरे नयनो मे राम)
भान हरी हा । मोहि नयना मना ॥धृ०॥
जिंकोनि अबला, तनु रोमरोमी । सत्ताबलानें,
विहार करी हा ॥१॥ मोहि नयना मना०
नयनात खेळे श्रवणांत बोले । ह्रदयात डोले प्राणसखा हा ॥
मोहि नयना मना ॥२॥


(चाल : छब दिखला जाये)
सुख विलया जाय; लागे हाय मना । चैन पडे नच जीवा या ॥धृ०॥
जाता पतिसुख क्षितिज धराया ॥ दूर पळत नच हातीं ये ॥
काय करू ? किती धावूं ! बहु शिणली श्रमाने ही काया ॥


(राग : भीमपलास, ताल : झपताल)
प्रेमगानी सतत रमली ही बालिका ॥
प्रेम-भवन-चरण दूर करवेल का ? ॥धृ०॥
जीवास आधार ॥ रवि पद महोदर ॥
नलिनी प्रणयाकुला ॥ विरहि विसरेल का ?


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP