मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत कुंजविहारी

संगीत कुंजविहारी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१४-४-१९०८).

१ ( चाल : राष्ट्रोन्नति अवनति)
ही प्रेम विमलतम माधुरी । सदा शुद्धतम राहते
लय होइ न जरि जठर विकल ॥धृ०॥
उगम पावते तरुणांच्या ह्र्दयीं ॥ परिणत समयी विकास तियेस ।
मूक होइ वय निदाधकलीं ॥ असे सदा चिर स्थली चिरस्थली ॥१॥

२ (चाल : ऊन आई बदरिया)
वाहि तूंतें ह्रदय हे सदा इतर ठायीं जाइ नच कधिंहि ॥धृ०॥
प्रणयपर सतत मी । स्मरण तव करितसे
मज इतर विषयि नच । हो सुख ह्रदसि ॥१॥


त्याजि भक्तासाठी लाज जगि दास होउनि आलों ॥धृ०॥
निजमुखांतली बोरें । दे मज शबरी स्वकरे
ती सेवूनी निधरि । अतितुष्ट मानसी झालो ॥१॥
करि रळी बळी छळिला । करि तुष्ट दानि मजला
जरि धरातळी नेला । तरी दास होऊनि ठेलो ॥२॥
करितसे अतां चोरी । कृणी गवळण मज मारी
जरी करी मला दूरी । तरी पाय चुरनीज घालों ॥३॥


सदा प्रणयाविकासिनी सुखदा रमणी
ह्रदयी धरली । ह्रदय जहाली । सकल कालीं ॥धृ०॥
रहन तिमिरि चपला चंचला । होय पथिक जन विराम
सोडी भ्रमा । विकल ह्रदय पतिला भवतमी हो दामिनी ॥१॥


चपलासी मंजुल बाले । कां मुख म्लान हे तव झाले ॥धृ०॥
सदाही विधुसम । कदा न उपरम । यदा करित शम
ह्रदा नलिनी मम । केवी या मम बोले ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP