(६-३-१९३३). संगीत : बालगंधर्व, मास्तर कृष्णराव
१
(राग : बिहाग, ताल : त्रिताल, चाल : अटल सब जानी)
असाचि दिसला ध्यानि चिंतना, मिरवित सोज्ज्वल भावभावना
सतत आपुले द्यावे नयना । प्रत्यक्ष दर्शन हीच प्रार्थना
२
(राग : जिल्हा पिलु, ताल : त्रिवट, चाल : पिया बिन चैन)
प्रिय जरि हा सहवास मला । आवरी उतावीळ मनाला
बंध धर्म सकला ॥धृ०॥
बंधन योगे अमर संसार । चंचल दु:खचि तो अविचार
धरीना संतोषाला
३
(राग : भीमपलास, ताल : एकताल, चाल : क्या करूं मै)
योग्य न प्रेम वर्णना ।
वाणी, मति-मनसासह, प्रेम धाम गांठिना ॥धृ०॥
ब्रह्म सत्य मज प्रेमा, बहु रूपा बहु नामा ।
घेईना समता तो एक एक भगवाना ॥१॥
४
(राग : मांड जिल्हा, ताल : रूपक, चाल : आइरी सजना)
लाविना मन हें अजि दोषा या जना ॥
निकटि आला, शरण गेला मम देह तत्क्षणा ॥१॥
५
(राग : जंगला, ताल : कवाली, चाल : विनति हमारी)
मजला घडावी देवा तव पादसेवा । सहवास द्यावा ॥
सेवेत भाग पावतां, सहजा मिळे समता । छंद असा पुरवावा ॥१॥
६
(राग : काफी, ताल : त्रिवट, चाल : लागि उचट)
सनातन नाद हा भगवाना ।
साधु जना पहावे, फुलवित दानत आचरित ज्ञाना ।
नाद-निनादे नारदा वदे । शील घे विषय गाना ॥१॥
७
(राग : झिंजोटी, ताल : कवाली, चाल : सिरी राम कहे)
सजला नटला जणु राजा । लखलखीत दावित तेजा ॥
बलसागर तारी दीना । तप सतत शीलधर राणा ।
बहु चमकवि साहस काजा ॥१॥
८
(राग : कर्नाटकी आनंदभैरवी, ताल : त्रिवट, चाल : भ्रुवसमया)
नयनीति ही बहु प्रेमळा । मज धर्म हा सजविला ॥
कुपथा मना कधिं दावि ना । विमल अबला दे नरा बला ॥१॥