संगीत भक्त दामाजी
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१५-११-१९६८). संगीत : गोविंदराव अग्नि
१
कोपलास कां दया सागरा । का झाला अन्यायीं
रडवितोस कां तुझ्या लेकुरा, जगती ठायीं ठायीं
का तव माया ममता सरली
कृपा तुझी का ओसरली ?
म्हणूनच का रे दैव कसाई काळिज तोडुन खाई
२
उधळित प्रलयाचा अंगार
तयाला कोण रोखु शकणार !
सुखवायाते सूड भावना
करावयाते रिपु-बल-हनना !
गहन कानना चेतवून मी
होम आज करणार !
३
“ओम् नमो भगवते वासुदेवाय ते”
मंत्र जपतांचि हा दुरित तम भंगते
जेथ ना हीनता, मलिनता ना जिथें
दिव्य लोकी अशा अढळ पद लाभतें ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP