(२२-४-१९२३.) संगीत : मास्तर कृष्णराव
१
(राग : काफी, ताल : त्रिवट, चाल : कोन गाव को छोरा)
भक्तिभाव हा, घ्या सेवा; रुचिर रूप तपनांत तापवा;
गोड गोड मज बोलवा ॥धृ०॥
अमर कलांसि मम देह धरि, सत्य सत्य त्या राघवा ॥१॥
२
(राग : शंकरा, ताल : त्रिवट, चाल : केशव हा गमला)
सन्निद्ध जी सेवा, सेवा तीच सुखदा विरही जनाला ॥धृ०॥
सौख्य असे विमल करा, सहजचि मारा मज विरहाला ॥१॥
३
(गजल ताल : केरवा, चाल : जुदाइमे तेरे)
इथेच थारा पराक्रमाला; म्हणोनि देवा जन्म आला ॥धृ०॥
परोपकारे सुखीच झाला, तनूसि झिजवित जगांत ठेला
तो शिकवितो या सेवेला ॥१॥
४
(राग : भीमपाल, ताल : त्रिवट, चाल : तुम बिन आये हो)
भूषण संसारा, विमला वनिता वश जरि जीवपसारा ॥धृ०॥
प्रेमळ जीवन या अधिकारा जीव पोचतां, मोक्षचि दुसरा ॥१॥
५
(राग : विहाग, ताल : त्रिवट, चाल : साच साच मत बोल)
सत्य, सत्य, नच फोला पाला, जरि नच सत्ये सौख्य गेला ॥धृ०॥
सुखफल सत्या नियमें आलें, तप झालें सुखसाधन मजला ॥१॥
६
(राग : बागेश्री, ताल : त्रिताल, चाल : बन बन बन आये)
प्रियकर वश मजला; विमल यश हेंचि, गुरुपदा देह चढला ॥धृ०॥
स्त्री पुरुषा गुरुता वेतां । विरह-कलह मन शांत झाला ॥१॥
७
(राग : जीवनपुरी, ताल : त्रिवट, चाल : छिन छिनया)
अजि पुरवा ही हौस प्रियकरा, मातृपदीं तनु मम बसवा ॥धृ०॥
स्त्री जगाला स्त्रीच विधाता, होत नाहीं जरि माता,
विश्व-सुखीं विष कालवा ॥१॥
८
(राग : भैरवी, ताल : त्रिवट, चाल : राजा मानिवे)
देहा विसरलें नच; मग सुख जाणा हीन वासना ॥धृ०॥
अभ्यास सतत सकलहि केला, डोल फोल नकळत पळाला;
देहसंग परि बुद्धि सोडिना ॥१॥