संगीत तुरुंगाच्या दारात
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.
(१-२-१९२३). संगीत : वझेबुवा
१
(राग : दरबारी, ताल : एकताल, चाल : नैनसी नैने मिला)
लांछना उगा जगासि । जनता दीना दाहि दिशाला पाहि न काला ॥धृ०॥
विविध रीति । भिन्न जाति । अवगणिता नच पाहती ।
कुणी नच मुळीं सांत्वनासि ॥१॥
२
(राग : भैरवी, त्रिदल, चाल : आयो पिया मन रसिया)
निशिदिनिं मनि धरिला हरिला । विसर न पडला या सुह्रदांचा ।
व्यालकालगत भेद निमाला ॥धृ०॥
प्रेमपुनीता मधुमति गीता । ह्र्दयकुसुमिता परभयभीता ।
स्वाराज्ये परिमल भरला ॥१॥
३
(राग : भीमपलास, ताल : त्रिताल, चाल : गोरे मुखसो मोरे)
जो कां सजला लोकां मिळावया । अगतिक जरि मनि वचनि ही वाया ॥धृ०॥
वचनि चटुक पटुता विगुणा । विरली कुटिल नि सदा भासमयी ।
४
(राग : शंकरा, ताल : त्रिताल, चाल : बन बन धुंडू)
दिसे वसे कमला गुणशील । नाथपद चुरिता विरागभये ॥धृ०॥
राहिली माया भागीरथी ती । ना सांडि गौरी हराला । तो तिजला ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP