शेख महंमद चरित्र - भाग ४
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
तेव्हां जयरामानें तुम्हीहिं आलें पाहिजे म्हणून शेख महंमदास विनविले. नंतर जयराम लव्याजम्यानिशीं वडगांवास परतले.
‘‘संख्या तेव्हां जाली अडीच वर्षांचीं । तेव्हां मर्यादेची घडी आली ॥११२॥
बोलाऊनि संत भक्त थोर थोर । समुदाय अपार थोर जाला ॥११३॥
आले तुकाराम ॠषिमुनि सिद्ध । म्हणती शेख महंमद केव्हां येती ॥११४॥
...करोनियां पाक पात्रें टाकियेलीं । कां हो वेळ झाली आणि न येती ॥११६॥
बोले तुकाराम आमुचे शेजारीं । पात्र लवकरी टाका आतां ॥११७॥
टाकिलेलें पात्र अन्न ते वाढिले । जयराम बोले कां हो न ये ॥११८॥
म्हणे तुकाराम तुम्हीं स्वस्थ राहावें । जेवितील भावे आतांचि ते ॥११९॥
शेख महंमदाची गुप्त त्याची फेरी । तुकया शेजारीं येऊनि बैसे ॥१२०॥
कोणासी दिसे न येक जाणे तुका । भोजन जन लोकां आज्ञा झाली ॥१२१॥
वरच्यावरी अन्न पात्रांतील सरे । नवल विचार करिते जाले ॥१२२॥
एक जण तुका वरकडां कळे ना । करोनि भोजना आंचवलें ॥१२३॥
येऊनि जयरामा तुकाराम बोले । आजि भाग्य जाले सुफळ तुमचे ॥१२४॥
शेख महंमदबाबा जेऊनिया गेले । कीर्तना येतील मागुती ते ॥१२५॥’’.
जयराम स्वामींनीं नंतर कीर्तन आरंभिलें, तेव्हां ‘‘महंमद स्वामी आले उठाउठी । देखियली दाटी ढाळ नसे ॥१३०॥
येऊनियां मध्यें पोथी उचलिली ।
टीपः
शकावली; रामदासी चरित्रलेखक वगैरेच्या लिहिण्याप्रमाणें जयरामस्वामींनीं वडगांवीं शके १५९४ भाद्रपद वद्य ११ गुरुवार परिधावी नाम संवत्सरें (=५ सप्टेंबर १६७२ इ.) रोजी समाधी घेतली. यावरून ही भेट अडीच वर्षें पूर्वी म्हणजे इ. स. २६६९ तील व शेख महंमदाच्या समाधीचा काल इ. स. १६७४ - ५ येईल. परंतु इ. स. १६७० पूर्वीच शेख महंमद कबरस्थ झाले हे निश्र्चित आहे. अर्थात् या चरित्रकाराचें लिहिणें वस्तुस्थितीस धरून नाहींसें दिसतें.
तुकोबाचा निर्णयकाल इ. स. १६५० त व जयरामस्वामींचा इ. स. १६७२ त झाला हें लक्षात घेतले म्हणजे या प्रसंगर्णनांतील अवास्तवता स्पष्ट होते.
शेख महंमद पीरवख्त होऊन गेल्याचें वृत्त त्यांचा शिष्य मुधा पांगुळ यानें इ. स. १६७० पूर्वींच लिहिलें आहे, हे येथें लक्षांत घेणें जरूर आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP