शेख महंमद चरित्र - भाग ११

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


शेख महंमदांनीं पंधराव्या प्रसंगांत सांगितलें की चांद बोधले यांनीं एकनाथाचे गुरु जे जनार्दनपंत त्‍यांना उपदेशिले. एकनाथानें चतुःश्र्लोकी भागवतावरील टीकाग्रंथ प्रथम केला. या ग्रंथाचे शेवटी त्‍यांनी एका ‘चंद्रनामा द्विजवरा’ चा उल्‍लेख केला आहे. तो असाः ‘‘तेवी चतुःश्र्लोकी भागवत । कैसेनि जालें हस्‍तगत । प्रवर्तावया कारण येथे । ऐका सुनिश्र्चित सांगेन मी ॥११७॥
गोदावरी उत्तर तीरीं । चौ योजनीं चंद्रगिरी । श्रीजनार्दन तेथवरी । दैवयोगें फेरी स्‍वभावें गेलों ॥११८॥
तो अति दीर्घ चंद्रगिरी । तळीं चंद्रावती न गरी । स्‍वयें चंद्रनाम द्विजवरीं । वस्‍ती त्‍याचे घरीं सहज घडली ॥११८॥
तेणें चतुःश्र्लोकी भागवत । वाखाणिलें यथार्थ युक्त । तेणें श्रीजनार्दन अद्‌भुत्‌ जाला उत्‍पुलित स्‍वानंदें पैं ॥१२०॥
तेणें स्‍वानंदें गर्जोन । श्रीमुखें स्‍वयें जनार्दन । बोलिला अति सुखावून । हें वर्णीं गुह्यज्ञान देशभाषा ॥१२१॥’’.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP