शेख महंमद चरित्र - भाग ६
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
खास शेख महंमदानें ‘योगसंग्राम’ नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. तो बेळगांव व मुंबईस छापून प्रसिद्धहि झाला आहे. त्यांतील अठराव्या अध्यायाचे शेवटीं या ग्रंथाचा समाप्तिकाल नमूद केला आहे तो असाः ‘‘पार्थीवनाम संवत्सर । ते दिवशीं केला ग्रंथ जाहीर । शुद्ध पौर्णिमा सोमवार । गुरुग्रहण पूर्ण होतें ॥३१८॥
शुद्ध श्रावण मास पाडवा । अधिक पहिल्या सोमवाराची ठेवा । पूजा बेलपत्रीं सदाशिवा । नामघोषें ब्रह्मानंदें ॥३१९॥
समुहुर्तामधील प्रातःकाळा । चढती रविचंद्राची प्रकाश कळा । तैसा सद्गुरूचा शब्द सोंवळा । हृदयी प्रकाशला ॥३२०॥
संपूर्ण ग्रंथाची अवस्था । ऐका पूर्णिमेस केली पूर्णता । शरण शेख महंमद वक्ता । सद्गुरुचरणी ॥३२१॥
ते दिवशीं ग्रंथ संपला । स्वयें सद्गुरुराजें लिहिला । शेख महंमद भूषण मिरविला । आपला आपलेपणें ॥३२२॥’’.
हा योग शके १५६७ श्रावण शुद्ध १५ प्रतिपदेसह, सोमवार, पार्थिव संवत्सर रोजीं म्हणजे ता. २८ जुलै १६४५ इ. सनांत येतो. अर्थात् या ग्रंथांत आलेली माहिती या कालापूर्वींची आहे. त्यांतील फक्त चरित्रविषयक तपशील सारांशानें पुढें उद्धृत करतो. शेख महंमदाच्या लिहिण्यांत शहाण्णव कुळींचें उल्लेख येतात. ते सर्व विशेषार्थानें येतात म्हणून पुढील सारांशांत त्यांचाहि समावेश केला आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP