शेख महंमद चरित्र - भाग ९
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आठवा प्रसंगः १०० ओंव्या.
नववा प्रसंगः १०९ ओंव्या
दहावा प्रसंगः ९५ ओंव्या
अकरावा प्रसंगः
‘‘हें तुम्हीं ऐकावें जी उत्तर । शहाण्णव कुळांनीं ॥२८॥
...शेख महंमद म्हणे श्रोत्यांलागून । कोणी असत्य मानाल हें वचन । निष्कलंक आधीं (प्रबोध ?) गीता पहा वाचून । माझ्यालागून तुम्ही ॥८३॥
.... कोणी ऐकेत न ग्रंथालागुनी ।---॥८४॥’’
---१०९ ओंव्या.
बारावा प्रसंगः
‘‘प्रणिपात केला जय जय श्रीसद्गुरु । आज हजरत मीरां पीर जाहिरु । त्याचे कृपेनें रत्नांचा सागरु । सिद्ध ग्रंथ आरंभिला ॥५॥
निकट निज भक्ताला नमस्कारुनी । केली पाखांडाची निखंदनी । कोप कांहीं न धरावा मनीं । अन्यत्र शाण्णव कुळांनीं ॥६॥
....बुधवार गतोंनी आला बृहस्पतवार । मग सारे मुसलमानाचा पीर ।.....॥३८॥’
’---१०६ ओंव्या.
तेरावा प्रसंगः
‘‘अंगसंगें अविनाश व्यापुन । ऐसेंचि बोलती गीतापुराणें । त्यावेगळे सांगतो सिद्ध साधुजन । दृष्टांत वचनें ॥३०॥
संतसाधूंचा उच्छिष्ट प्रसाद । स्वीकारून बोलतसे शब्द । ब्रह्मानंदें शेख महंमद । वाक्रत्नें निरोपी ॥३१॥’’
---१०८ ओंव्या.
Last Updated : November 11, 2016
TOP