शेख महंमद चरित्र - भाग १६

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


श्रीगोंदे येथील स्‍थानिक दंतकथांचा श्री. वागळे यांनी आपल्‍या ‘योगसंग्रामा’च्या प्रस्‍तावनेत आढावा घेतला आहे. त्‍यांनीं आपली प्रस्‍तावना मोरोपंतांच्या ‘सन्मणिमालें’तील शेख महंमदाबद्दलच्या उक्तीनें सुरूवात करून आपला सर्व भर महिपतीच्या लिहिण्यावरच दिला आहे. शेख महंमद हे मूळ रुईवाहिरेचे रहिवासी असून त्‍यांच्या घराण्यांत मुलाणाची वृत्ति होती. परंतु बकरें मारतांना त्‍यांस विरक्ति झाली. दुसरी दंतकथा अशी कीं, अलमगीर बादशहाची स्‍वारी झाली. त्‍या वेळीं त्‍या सक्तीची बिगार वहावयास लावली. परंतु डोकीवरील ओझें सव्वा हात उंच अधांतरी असल्‍याचें दृष्‍टीस पडल्‍यानें हा कोणी अवलिया आहे असें जाणून त्‍याची अलमगिरीनें व्यवस्‍था लाविली. श्रीगोंद्यास मठ करून ते राहूं लागले. गुरूचें नांव चांग किंवा चंद्र बोधले असें देऊन आणखी एक तेथील दंतकथा त्‍यांनी दिली आहे ती अशीः शेख महंमदबाबाचे समकालीन सत्‍पुरुष म्‍हणून प्रल्‍हादबाबा, राऊळबाबा व गोधडबाबा होते. यांपैकी प्रल्‍हादबाबा व महंमद बाबा गृहस्‍थाश्रमी होते. महंमदबाबांचा पुण्यतिथीचा दिवस फाल्‍गुन शुद्ध नवमी हा पाळतात. त्‍यांच्या कबरीची हिंदु एका बाजूस व मुसलमान दुसरे बाजूस पूजा करितात.

दासगणूंच्या आख्यानसमुच्चयांत शेख महंमदावर दोन आख्यानें आहेत. त्‍यांचा ‘बकरा कसाई’ चे कुलांत जन्म झाला व योगसाधन पिसोरे खांड वनांत झाले. चांद बोधले योगयोगेश्र्वर यांनी गोदातटीं त्‍यांस ज्ञानेश्वरी दान दिली. आणखी दोन किरकोळ कथा दिल्‍या आहेत. त्‍यांत कोणी रंगु नावाची म्‍हातारी पोथी ऐकल्‍यानें बरी झाली व शेख महंमद व सिरूर (घोडनदी) देसाई यांचा पूर्वसंबंध जोडून त्‍यामुळे देसाईचे वंशज श्रीगोंद्यास दर वर्षी जातात अशी माहिती दिली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP