शेख महंमद चरित्र - भाग ८

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


चवथा प्रसंगः

‘‘शरीर जें नामें रंगलें मुसलमान । तें शरीर पूजिलें पीर म्‍हणोन । मृत जाल्‍या चाले महिमान । यालागीं शुभ आचरावें ॥२२॥
..... आतां सद्‌गुरूस करूनी नमस्‍कार । आदरें नमस्‍कारिलें चराचर । हे शहाण्णव कुळीं माझें गोत्र । ज्ञानविज्ञान भासे ॥४९॥
....दश लक्षणीं प्रमाणता आवडी । एक एकें चरणीं घ्‍यावी गोडी । तोडोनियां द्वैताची बेडी । गोदा-नीर व्हावें ॥६४॥
.....ऐका भिसभिल्‍ल अल्‍ला हूं अकबर । टीका धरा भावभक्तीचा अंकूर । एवं बोलते हजरत मिरां पीर जहीर । दीन उद्धरणालागीं ॥९५॥
.....निकट बौधिक हृदयीं गंगानीर । ऐसे शिष्‍य अंगिकारावे ॥९६॥
---१०३ ओंव्या.

पांचवा प्रसंगः

‘‘मुलाणा तो जो आपुलें मूळ जाणें । आपुलें दुःख तैसें परावें माने । अनिर्वाच्य बांग ब्रह्मांड दणाणे । सोऽहं तसबि फेरी ॥८१॥
अहंकार टोणगा अक्‍कल सुरी । विवेकें कापून भक्षण करी । उन्मनि मशिदींत नमाज गुजरी । त्‍या बोलिजे मुलाणा ॥८२॥
फकीर तो जो राग विषयीं सांडवला । श्र्वास उच्छ्‌वासें नित्‍य आठवी अल्‍ला । देखोनि पळे बाष्‍कळ गलबला । एकांत सुख भोगी ॥८३॥
फकीरपणाचा दावी ना तोरा । स्‍वयें वाटा बुजविल्‍या तेरा । प्रेमाचा अंमल लागली सहज मुद्रा । सत्‍य फकीर जिंदा ॥८४॥
.....यवनांचा आचार्य मुल्‍ला काजी । सकळ अधर्मांसी द्यावी बाजी । गोत्रास करावें भक्तीस राजी । तो आचार्य खरा ॥९९॥
चौदा पंथाचा आचार्य सोफी खरा । आपल्‍याच मार्गास म्‍हणती बरा । आणिकातें निखुंदुनि करी तोरा । त्‍याचें ज्ञान मिथ्‍या असे ॥१००॥’’

---११६ ओंव्या.

सहावा प्रसंगः

‘‘..... विकासे शेख महंमद मुसलमान ।
.....॥१०॥ मुसलमान म्‍हणविलें एक्‍या गुणें । मुसेस नव मास वस्‍ती करून । होतो म्‍हणून वोळखा खूण । पवित्र हो तुम्‍ही ॥११॥’’
---१२१ ओंव्या.

सातवा प्रसंगः

‘‘पर्वकाळ रविवार दिन । तीरा गेलों तुमचें सेवेलागून । तेथें कां मज लावियलें पान । सांगा स्‍वामी पुसतों भावें ॥९३॥
ऐसें भुजंगानें डंखिलें तिनदां । तिनदां विष दिधलें गोविंदा । तुझें काय चुकलों परमानंदा । मज कळले पाहिजे ॥९४॥
यावेगळें मज छळति दुर्जन । नानापरी बोलती अवलक्षण । इंद्रियेंहि घाले घालिती जपोन । परी चकेच ना तुझें कृपें ॥९५॥
भाव भक्ति वैराग्‍य करितां मना । महा कष्‍टी जालों बा निज मंडना । तुझी सत्ता सकळ त्रिभुवना । मज कां गांजविशी ॥९६॥
शेख महंमदी संतोष सद्‌गुरु खुणें । सत्‍य स्‍वामी जेव्हां लागली होतीं पाने । तेव्हां धावां केला अद्वैत बोधानें । मग झेंडू फुटोन गेला ॥९९॥
....भावें वर्णिली ईश्र्वराची लीला ।.....॥१००॥’

’---१०० ओंव्या.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP