मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
बा मना जाशीरे कुठे । विषय...

भक्ति गीत कल्पतरू - बा मना जाशीरे कुठे । विषय...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


बा मना जाशीरे कुठे । विषयांत तुज सुख न भेटे ॥धृ०॥

स्वसुखाते सोडुनीया । कां वणवण भटकत फिरसी ।

या भवाटवीमध्ये शिरुनी । अविद्या रानीं भ्रमसी ।

व्याघ्रादिक क्रूर पशू हे । ओढुनीया नेती तुजसी ॥चाल॥

ऐशा ह्या अविद्या रानीं । तुज मारिती घोळसुनी ।

घालिती जन्ममरण यांनी ॥चा.पू.॥

हे संसृतीचे बसती चपाटे । विषयांत तुज० ॥१॥

दे सोडुनी संग तयांचा । करी संतापायीं वस्ती ।

अस्ती भाती प्रियरुप आत्मा । जाणुनीया दृढ धरी चित्तीं ।

सद्‌गुरुकृपें गुज कळतां । शांत होईल चित्तवृत्ती ॥चाल॥

मग नाही येणें जाणें । स्वसुखांत बुडुनी राहणें ।

आनंद लाटांत पोहणें ॥चा.पू.॥

तें सुख कधीही न आटे । विषयांत तुज० ॥२॥

सद्‌गुरुला जावुनी शरण । सुखसोय लावुनी घेई ।

यावांचुनी अन्य उपाय । भवसागरीं दुसरा नाही ।

श्रृती युक्ति अनुभूतीने । तुजला हें पटवुनी घेई ॥चाल॥

कृतकृत्य वाटें तुज झालो । स्वसुखासी जावुनी मिळालों ।

स्वानंद सुखांतची रमलों ॥चा.पू ॥

वारी म्हणे चित्‌चित्‌ग्रंथी सुटे । विषयांत तुज० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP