मना तूं लक्षीं । मना तूं लक्षीं । होवुनीया सर्व साक्षी ॥धृ०॥
साक्षी होवुनी जरी तूं पाहसी । मुक्त होशील निश्चयेसी ।
हेंची सद्गुरु तुज उपदेशी । पूर्वपक्षीं पूर्वपक्षीं । होवुनीया० ॥१॥
ऐसा साक्षी होतां दृढ । अंतरीं वृत्ती होईल रुढ ।
मग तुजसी कांही न गूढ । अंतरीं निरक्षी । होवुनीया० ॥२॥
ऐशा अभ्यासाच्या योगें । लय साक्षी कळुं लागे ।
मग सदा स्वरुपीं जागें । लय साक्षी लय साक्षी । होवुनीया० ॥३॥
लय साक्षी तुज निश्चय कळता । सद्गुरु कृपा आली हातां ।
अभ्यासाने वाढवी आतां । वारी म्हणे नुपेक्षी । होवुनीया. ॥४॥