मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
बा सूज्ञ मना तूं सोडी देह...

भक्ति गीत कल्पतरू - बा सूज्ञ मना तूं सोडी देह...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


बा सूज्ञ मना तूं सोडी देहत्रयाची आंस ।

स्वस्वरुपी रमुनीं दृढ करी ब्रम्हाभ्यास ॥धृ.॥

या विषयी जनीं तूं राही सदा उदास

ही गोड बोलुनी फसविती तुजला खास ।

या अमोल्य आयुष्याचा करुं नको नाश ।

करी अखंड चिंतन एकांतीं करुनी वास ॥चाल॥

एकांतीं सुख हें किती गोडरे ।

ही विषय संगती सारी सोडरे ।

मग पुरतील मनींचें सारे कोडरे ॥चा.पू.॥

सद्‌गुरुवचनीं तूं ठेवूनीया विश्वास ।

स्वस्वरुपीं रमुनी दृढ करी ब्रम्हाभ्यास । बा सूज्ञमना ॥१॥

या विषयीं जनामध्ये करुं नको तूं चावटी ।

तूं अखंड ठेवुनी राही स्वरुपीं दृष्टी मग आत्मसुखाची

येईंल तुजला पुष्टी । हा विवेक करुनी उघड ती ज्ञानदृष्टी ॥चाल॥

सद्‌गुरुबोध हा मनीं घेवुनी । तूं राही सदोदित स्वात्मचिंतनीं ।

वृत्ती ही अखंड ध्यानीं रंगुनी ॥चा.पू.॥

मग खास पावशी तूं बा स्वसुखास ।

स्वस्वरुपीं रमुनी दृढ करी ब्रम्हाभ्यास । बा सूज्ञ मना ॥२॥

बोलणें असें बा जरी तुजला लोकांतीं ।

तत्‌चिंतन तें तूं सोडुं नको प्राणांतीं ।

ही ब्रम्हचिंतनीं कां अभ्यासें दृढ करी ।

मग वृत्ती तुझीरे रमेल सुखसागरीं ।

॥चाल॥ मग वृत्ती तुझी येईना बाहेर ।

स्वसुखांत होईल ती तदाकार ।

त्या स्वानंदा तूं भोगी निरंतर ॥चा.पू.॥

म्हणे वारी अखंड भोगी तूं स्वसुखास ।

स्वस्वरुपीं रमुनी दृढ करी ब्रम्हाभ्यास । बा सूज्ञ मना तूं० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP