मना धरी धीर । मना धरी धीर । स्वस्वरुपीं होई स्थीर ॥धृ०॥
सोडी आतां येणें जाणें । किती दिवस तरी भटकणें ।
स्वरुपीं जावुनी अखंड राहाणें ॥ नीरंतर॥ स्वस्वरुपीं०॥१॥
स्वरुपा सोडुनी कां तूं राहसी । भटकत किती दिवस फिरसी ।
स्वसुखाला व्यर्थची मुकसी ॥ मागे फीर ॥ स्वस्वरुपीं०॥२॥
जावुनी आपुल्या निजस्वस्थाना । करुनी घेई समाधाना ।
वारी सांगे तुज बा मना ॥ करी विचार ॥ स्वस्वरुपीं०॥३॥