रामनामीं बहु सार ॥मनारे॥रामनामीं बहु सार ॥धृ०॥
राम नामें पाषाण तरले । करील तुज भवपार ॥
मनारे॥रामनामीं बहु सार ॥१॥
राम नाम हें शंकर घेतां । झालें विष तें गार ॥
मनारे॥रामनामीं बहु सार ॥२॥
वारी म्हणे बा राम नाम हें । सुख तुज देई अपार ॥
मनारे॥राम नामीं बहु सार ॥३॥