मना तुं ब्रह्म पाही तें । सच्चिदानंद रुप जें नटलें । जगतीं पाही तें ॥धृ०॥
आस्ती भाती प्रीय जो आत्मा । नामरुपातींत तो परमात्मा ।
अंतरीं पाही त्या परमात्मा । करुनी घ्यान तें । मना तूं० ॥१॥
मग सुख तुज अपरंपारा । जाणुनी पूर्ण करी विचारा ।
पावसी मग तू चित्सागरा । निजानंदाते मना तूं० ॥२॥
उघडें ब्रह्म सगुणरुपातें । सगुण निर्गुण एकची होतें ।
वारी अनुभव सांगे तूं ते । गाई नित्य तें । मना तूं० ॥३॥