नाम हरीचें गाई ॥ मना तूं ॥ नाम हरीचें गाई ॥धृ०॥
नामीं असें हो सार हरीचें । शोधुनी त्या तूं पाही ॥मनारे॥नाम० ॥१॥
नामस्मरणीं गोडी असे जी । स्वाद तिचा तूं घेई ॥मनारे॥नाम० ॥२॥
रसस्वाद हा नामीं असे जो । पिवुनी तृप्त तूं होई ॥मनारे॥नाम० ॥३॥
नाम असे हें थोर हरीचें । गुरुपदीं घेऊनी जाई ॥मनारे ॥नाम० ॥४॥
वारी म्हणे हरीनामाची गातां । निर्विकार जीव होई ॥मनारे॥नाम० ॥५॥