झालें पाहिजे ॥ मनारे ॥ ऐसें झालें पाहिजे ।
स्वसुखाचें तेज मुखावर । दिसलें पाहिजे ॥मनारे॥धृ०॥
अखंड अभ्यासाने वृत्ती । स्वरुपीं मिळवुनी या तिजप्रती ।
येवुनीया मग देहावरती । स्वानंदा भोगिजे ॥मनारे॥ऐसें० ॥१॥
सर्वांठायीं वस्तु एकची । आस्ती भाती दिसे ती प्रियची ।
मना अशी ती गोडी त्याची । लावुनी घेईजे ॥मनारे॥ऐसें ॥२॥
द्रुष्टा साक्षी असे मी जाणुनी । सुखदुःखातें परोक्ष मानुनी ।
स्वस्वरुपीं ही वृत्ती रंगवुनी । हरीगुण गाईजे ॥मनारे ॥ऐसें० ॥३॥
गातां गातां सहज सुखाची । प्राप्ती होईल स्वानंदाची ।
ऐसी वृत्ति केली वारीची । सद्गुरुराजे ॥मनारे ॥ऐसे० ॥४॥