मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|मनोपदेशपर पदे|
हरीपायीं रत हो रे मना तूं...

भक्ति गीत कल्पतरू - हरीपायीं रत हो रे मना तूं...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


हरीपायीं रत हो रे मना तूं । हरीपायी रत हो रे ॥धृ.॥

हरीपायीं रत होतां मनारे । देईल सुख तुजला रे ॥ मना तूं ॥हरीपायीं०॥१॥

हरीपद हेची निर्भय करिती । भवसागरीं तुजला रे ॥ मना तूं ॥हरीपायीं०॥२॥

चरण महिमा शंकर जाणें । मस्तकीं गंगा धरीतो रे ॥ मना तूं ॥हरीपायीं०॥३॥

वारी म्हणे रत होतां हरी तुज । मुक्तची तो करीतो रे ॥ मना तूं ॥हरीपायीं०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP