हरी बोल हरी बोल, नित्य मना तूं ।
नरदेह व्यर्थची घालविसी कां तूं ॥धृ०॥
हरी हरी बोलतां, जाईल भवव्यथा ।
हरी नाम घेसी तरी, साधे परमार्था । हरी बोल० ॥१॥
हरी नाम गोड, फारची आहे । स्वाद त्याचा तूं घेवुनी पाहे । हरी बोल० ॥२॥
हरी नाम मधुर अह, रस चाखीतां । जन्म मृत्यूची नये वार्ता । हरी बोल० ॥३॥
वारी म्हणे हरी, नामींच रंगा । सोडुनी सर्वही विषयाचे संगा । हरी बोल० ॥४॥