मना तुज, सांगूं किती वारंवर ॥धृ०॥
विषयवासना सर्व सोडुनी । होई स्वरुपाकार । मना तुज० ॥१॥
विषय हे विष पीतां तुज बा । मारुनी टाकील ठार । मना तुज० ॥२॥
नामामृत हें पान करुनी । काढुनी घेई सार । मना तुज० ॥३॥
स्वात्मसुख हें प्राप्त होण्या । कर कांही सुविचार । मना तुज० ॥४॥
वारी म्हणे बा अनन्य भावें । सद्गुरुपदीं बुडी मार । मना तुज० ॥५॥