गौरीची गाणी - गौराय उभी आहे
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
गौराय उभी आहे
ये बनाखाली बाय ते बनाखाली
नारले बनाखाली, गौराय उभी आहे
नारल खाते सोलूनी, सालं देते फ़ेकूनी
ये बनाखाली बाय ते बनाखाली
केलनी बनाखाली, गौराय उभी आहे
केलनी खाते सोलूनी, सालं देते फ़ेकूनी
ये बनाखाली बाय ते बनाखाली
सोपार बनाखाली, गौराय उभी आहे
सोपार्या खाते सोलूनी, सालं देते फ़ेकूनी
गौराई उभी आहे
या बनाखाली बाई त्या बनाखाली
नारळी बनाखाली, गौराई उभी आहे
नारळ खाते सोलूनी, करवंटी देते फ़ेकूनी
या बनाखाली बाई त्या बनाखाली
केळी बनाखाली, गौराई उभी आहे
केळ खाते सोलूनी, करवंटी देते फ़ेकूनी
या बनाखाली बाई त्या बनाखाली
पोफ़ळी बनाखाली, गौराई उभी आहे
सोपार्या खाते सोलूनी, करवंटी देते फ़ेकूनी
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP