गौरीची गाणी - बावन खिडक्या
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
बावन खिडक्या
तं बाय बंगल्याला बावन खिडक्या
बावन खिडक्याला बाय बावन आरसं
बावन आरशाला बाय बावन नारी
बावन नारीची बाय बावन बाला
बावन बालाच्या बाय बावन टोप्या
बावन टोप्याला बाय बावन गोंडं
बावन्न खिडक्या
त्या बाई बंगल्याला बावन्न खिडक्या
बावन्न खिडक्यांना बाई बावन्न काचा
बावन्न काचांशीबाई बावन्न नारी
बावन्न नारींची बाई बावन्न मुले
बावन्न मुलांना बाई बावन्न टोप्या
बावन्न टोप्याना बाई बावन्न गोडे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP