गौरीची गाणी - ढवाल्या
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
ढवाल्या
कारवे डोंगराला रं दाजीबा
कारवी तोडशी रं दाजेबा
भारासा बांधशी रं दाजीबा
हाकाशा मारील्या रं दाजीबा
गवारी दादाला रं दाजीबा
ये भारा उचलाया रं दाजीबा
भारा उचलतांना रं दाजीबा
ढवल्या खेलशी रं दाजीबा
ढवाल्या नाही बर्या रं दाजीबा
फ़ुकट पैसं रं दाजीबा
छेडाछेडी
कारव्या डोंगरावर, रे दाजीबा
कारवी तोडते, रे दाजीबा
भारा बांधते, रे दाजीबा
हाका मारल्या, रे दाजीबा
गुराखी दादाला, रे दाजीबा
ये भारा उचलायला, रे दाजीबा
भारा उचलताना, रे दाजीबा
छेड काढू लागला, रे दाजीबा
छेडाछेडी नाही बरी, रे दाजीबा
फ़ुकट पैसे भरशील, रे दाजीबा
मी पोलीसाकडे तुझी तक्रार केली तर तेथून सुटण्यासाठी तुला विनाकारण पैसे भरावे लागतील अशी धमकी.
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP