मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|गौरीची गाणी|
बंधू माझा ग

गौरीची गाणी - बंधू माझा ग

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


बंधू माझा ग
वाटंवं रायदुल पेरी बंधू माझा ग
ओट्यावं सोनार बोलवी बंधू माझा ग
पायाचं पैंजण घडवी बंधू माझा ग

वाटंवं रायदुल पेरी बंधू माझा ग
ओट्यावं सोनार बोलवी बंधू माझा ग
पायाचं मुगड्या घडवी बंधू माझा ग
(मुगड्या-कानात घालायचा एक अलंकार. त्यात मुगाच्या दाण्याएवढे गोल कोरलेले असतात.)

बंधू माझा ग
वाटेवर राई पेरतो, बंधू माझा ग
ओट्यावर सोनार बोलावतो, बंधू माझा ग
पायातले पैंजण घडवतो, बंधू माझा ग

वाटेवर राई पेरतो, बंधू माझा ग
ओट्यावर सोनार बोलावतो, बंधू माझा ग
पायातले मुगड्या घडवतो, बंधू माझा ग

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP