नको धरू रे
कशी बाहोली बाहोली जाते वनाला ग
पुढं भेटला म्हसके दादा
असा बाहोले बाहोले धरीन तुला ग
असा नको धरू रे, म्हसके दादा रे
घरी आहेता तानुले बाला रे
कशी बाहोली बाहोली जाते वनाला ग
पुढं भेटला गायके दादा
असा बाहोले बाहोले धरीन तुला ग
असा नको धरू रे, गायके दादा रे
घरी आहेता तानुले बाला रे
कशी बाहोली बाहोली जाते वनाला ग
पुढं भेटला गुराखे दादा
असा बाहोले बाहोले धरीन तुला ग
असा नको धरू रे, गुराखे दादा रे
घरी आहेता तानुले बाला रे
कशी बाहोली बाहोली जाते वनाला ग
पुढं भेटला शेलके दादा
असा बाहोले बाहोले धरीन तुला ग
असा नको धरू रे, शेलके दादा रे
घरी आहेता तानुले बाला रे
कशी बाहोली बाहोली जाते वनाला ग
पुढं भेटला ढोलके दादा
असा बाहोले बाहोले धरीन तुला ग
असा नको धरू रे, ढोलके दादा रे
घरी आहेता तानुले बाला रे
(बाहोली-मोठी जाऊ, म्हसके दादा-म्हशी राखणारा, गायकेदादा-गायी राखणारा, ढोलके दादा-ढोल वाजवणारा)
नको धरू रे
कशी जाऊबाई, जाऊबाई जाते रानात ग...
पुढे भेटला म्हशी राखणारा
म्हणतो, धरीन तुला ग
असा नको धरू रे, म्हसके दादा
घरी आहेत माझी लहान लेकरे
कशी जाऊबाई, जाऊबाई जाते रानात ग...
पुढे भेटला गायी राखणारा
म्हणतो, धरीन तुला ग
असा नको धरू रे, गायकेदादा
घरी आहेत माझी लहान लेकरे
कशी जाऊबाई, जाऊबाई जाते रानात ग...
पुढे भेटला गुरे राखणारा
म्हणतो, धरीन तुला ग
असा नको धरू रे, रुराखेदादा
घरी आहेत माझी लहान लेकरे
कशी जाऊबाई, जाऊबाई जाते रानात ग...
पुढे भेटला शेळ्या राखणारा
म्हणतो, धरीन तुला ग
असा नको धरू रे, शेळकेदादा
घरी आहेत माझी लहान लेकरे
कशी जाऊबाई, जाऊबाई जाते रानात ग...
पुढे भेटला ढोल राखणारा
म्हणतो, धरीन तुला ग
असा नको धरू रे, ढोलकेदादा
घरी आहेत माझी लहान लेकरे