गौरीची गाणी - दळण
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
दळण
दारीले अळवटावं पाखेरू अजाळं
सासूनं दिलाय मला वरया दळायं
काय दळू सासूबाय हात माझं कवाळ
दळाय दळीते पर नंजर लाहीते
नंजर लाहीते धाकले दिरावं
धाकला दीर माझा गायीचा गवारी
शेणीची वाट माझी गायीनं मोडली
दळण
दाराच्या उंबर्याजवळ कोंबडा आरवला
सासूबाईंनी दिल्या मला वर्या दळायला
कशी दळू सासूबाई, हात माझे कोवळे
दळायचे म्हणून दळते पण लक्ष ठेवते
लक्ष ठेवते धाकट्या दिरावर
धाकटा दीर माझा राखतो गायी
गोवर्यांची ढीग माझी गायीने मोडली
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP