गौरीची गाणी - कोंड्याची भाकरी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कोंड्याची भाकरी
घाटावरून वो उतरेला जोगी
त्याचं बिर्हाड वो चिचं झाडाखाली
-आय मी जात्यावं जोग्या बिर्हाड पाह्या....
-नको जाऊ वं लाडक्या लेकी
तुलमा देईन वं इमान शेती...
-कायमा करू त्या इमान शेतीला?
घरी बाईचा मुळारी ठेपला
त्याला भुजायी कोंड्याची भाकरी
त्याला वाटायी आलनी चटणी
खाई जावायी कोंड्याची भाकरी
कोंड्याची भाकरी
घाटावरून उतरला जोगी
त्याचं बिर्हाड चिंचेच्या झाडाखाली
आई, मी जाते ग जोग्याचे बिर्हाड पाहण्या....
-नको जाऊ ग लाडक्या लेकी
तुला देईन ग इनाम शेती...
-काय करू मी त्या इनाम शेतीचं?
घरी लेकीचा मुळारी येऊन थांबला
त्यालासाठी भाजली कोंड्याची भाकरी
त्यालासाठी वाटायी आळणी चटणी
खातो जावाई कोंड्याची भाकरी
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP