गौरीची गाणी - कान्हाच्या वनगायी
वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.
कान्हाच्या वनगायी
तीन वाश्यांची झोपडी
त्यात कान्हाच्या वनगायी
कान्हाने सोडल्या वनगायी
गायी लावील्या डंडाला
उभा राहीला गोंडाला
गायी गेल्या वंदंला काय करू त्या नंदंला
गायी गेल्या आसर्याला काय करू त्या सासर्याला
गायी गेल्या आसूला काय करू त्या सासूला
गायी गेल्या ओवर्याला काय करू त्या नवर्याला
कान्हाच्या वनगायी
तीन वाशांचा गोठा
त्यात कान्हाच्या वनगायी
कान्हाने सोडल्या वनगायी
गायी सोडल्या कुरणात
उभा राहीला बांधावर
गायी गेल्या दूरवर, काय करू मी नणंदेचे
गायी गेल्या आसर्याला, काय करू मी सासर्याचे
गायी गेल्या बाजूला, काय करू मी सासूचे
गायी गेल्या ओसरीला, काय करू मी नवर्याचे
N/A
References : N/A
Last Updated : February 12, 2013
TOP